ज्ञानी पुरूषाचे लक्षण
ज्ञानी महापुरुषाचे लक्षण:-
अभिमान न बाळगता सर्वांच्या समोर नतमस्तक होणे हेच खऱ्या ज्ञानाचे लक्षण आहे. अहंकार वाईट आहे. ज्यांच्या जीवनात अभिमान नाही तेच खरे संत आहेत. ज्याच्या जीवनात ज्ञानरुपी फळ प्राप्त झाले तोच झुकतो सर्वांसमोर नतमस्तक होतो.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करून सांगतात,
का फळलिया तरूची शाखा। सहजे भूमीसी उतरे देखा। तैसे
जीवमात्रा अशेखां। खालावती ते।।
जास्त फळ असलेल्या झाडाचीच शाखा ही जमिनीच्या दिशेने वाकलेली दिसते. त्याचप्रमाणे फक्त ज्ञान ज्ञान म्हटल्याने ज्ञान होत नाही. जे खरे ज्ञान असते ते सर्वांच्या समोर नतमस्तक होण्यासाठी कारणीभूत असते.
खरे ज्ञान कोणाला हे कसे समजावे तर,
जे जे भेटे भूत। ते ते मानिजे भगवंत। हा भक्तियोगु निश्चित। जाण माझा।।जो खरा ज्ञानी असतो त्याला प्रत्येक प्राणिमात्रामध्ये भगवंत दिसतो. जो खऱ्या अर्थाने सर्वांच्या समोर नतमस्तक होत असतो त्यालाच खरे ज्ञान झाले असे समजावे हेच खऱ्या ज्ञानाचे लक्षण आहे.नम्र झाला भूता। तेणे कोंडीले अनंता।।
म्हणून अशा पद्धतीने सर्वांसमोर नम्रतेने नतमस्तक होणे हेच खरे ज्ञानाचे लक्षण आहे.
_गुरुवर्य श्रीकृष्णकृपांकीत🙏🏻🌸🌷
-अधिक चिंतनासाठी लिंक🙏🌸🙏
रामकृष्णहरी🙏🏻🌸🌷
Radhe radhe
ReplyDelete