संतसंगतीचे काय सांगू सुख
संतांची संगती ही अतिशय महत्वाची असते. संतांची संगती ही सहजपणे मिळत नाही. भगवान परमात्म्याच्या कृपेनेच संतांची संगती प्राप्त होत असते.
संतसंगतीचे काय सांगू सुख | आपणापारिखे नाही तेथे ||
संतांच्या संगतीत आपलेपणा अन परकेपणा नसतो. संतांजवळ सर्वजन आपलेच असतात. संतांसाठी परके कोणी नसतेच. त्यांच्यासाठी सर्वजन स
मानच असतात. असे त्या ठिकाणी सर्वांवर समदृष्टीने प्रेम करणारे संत असतात.
ऐसी कळवळ्याची जाती | करी लाभावीण प्रीती ||
असे लाभवाचून प्रेम करणारे संत आहेत. ज्याप्रमाणे आई लेकरावर प्रेम करत असते त्याप्रमाणे संत हे त्यांच्या शिष्यावर प्रेम करत असतात. संतांची भेट होणे ही फार दुर्लभ गोष्ट आहे.
बहू अवघड आहे संतभेटी | परी जगजेठी करुणा केली ||
चंद्रामृत त्या ठिकाणी सहजपणे सेवन करता येईल. अस्तमाला जाणारा सूर्य देखील पकडता येऊ शकतो. अशा कठीण गोष्टी साधता येतील पण साधूची संगती ही सहजपणे साधता येणार नाही. राजाच्या संगतीत एक दिवस गुलामी करावी लागेल पण साधूंची संगती केली तर एक दिवस भगवान परमात्म्याची प्राप्ती घडून येईल. एवढे सामर्थ्य हे साधूच्या संगतीतील आहे. साधूसंत हे भगवान परमात्म्याची प्राप्ती करून देणारे आहेत. म्हणून संतांशिवाय भगवान परमात्मा प्राप्त होत नसतो.
त्यांचेनी गोपाळ कृपा करी ||
संतांशिवाय भगवंताची प्राप्ती होणार नाही. म्हणून,
संतांवीण प्राप्ती नाही | ऐसे वेद देती ग्वाही ||
तसेच
हरि प्राप्तीसी उपाय | धरावे ते संतांचे पाय ||
ज्यांच्या अंतःकरणात भगवंताच्या प्राप्तीची उत्कट इच्छा आहे. त्यांनी संतांना शरण गेले पाहिजे. साधूसंतांची सेवा केली पाहिजे. त्यांच्या सेवेतूनच भगवंताचे प्रेम प्राप्त होते.
__गुरुवर्य श्रीकृष्णकृपांकित🙏🏻🌸🌷
चिंतनाची लिंक
रामकृष्णहरि🙏🏻🌸🌷
Comments
Post a Comment