सत्यवादी व्यवहार हीच भगवान परमातम्याची पूजा
र्व ठिकाणी भगवान परमात्माच गच्च भरलेला आहे असे समजून भगवान परमात्म्यासोबत व्यवहार करावा. सत्यवादाने व्यवहार करावा. आपल्या व्यवहारापासून समोरच्याला कोणत्या व्यवहाराचे दुःख होऊ देऊ नये. प्रत्येकाचे मन राखावे.
प.पू. ब्रह्मलीन स्वामीजी नेहमी सांगत असे,
राखावी बहुतांची अंतरे | भाग्य येती तदनंतरे ||
प्रत्येकाचे अंतःकरण जपावे लागते. कोणालाच दुःख प्राप्त होऊ नये. याची जबाबदारी घेतली पाहिजे. खरा परमार्थ हाच आहे. शस्त्राने जरी इजा होत असेल ना, त्याहीपेक्षा जास्त शब्दाने इजा होत असते. शस्त्राने झालेली जखम औषधाने बरी होते पण शब्दाने झालेली जखम ही कशानेही ठीक होत नसते. म्हणून शब्दसुद्धा शस्त्र आहेत. ते जपून वापरले पाहिजे. आपल्या शब्दाने जर कोणी दुखावले जात असेल तर माझा देव दुखावला गेला असे वाटले पाहिजे. सर्व ठिकाणी तो परमात्माच गच्च भरलेला आहे असे पहावे. असे पाहून त्या भगवान परमात्म्यावर प्रेम करावे. अन प्रेम करून त्याला सुखी करावे. त्या भगवान परमात्म्याला सुखी कराल तर तो भगवान परमात्मा दर्शन देईल. आशीर्वाद देऊन कृपा करील. म्हणून आपण प्रत्येकाशी देव समजून व्यवहार करावा. सत्यवादाने प्रत्येकाशी व्यवहार करणे हीच भगवान परमात्म्याची पूजा आहे.
__गुरुवर्य श्रीकृष्णकृपांकित🙏🏻🌸🌷
चिंतनाची लिंक-
![]() |
*रामकृष्णहरि🙏🏻🌸🌷*
Comments
Post a Comment