Posts

भगवद् दर्शनाची ओ ढ

Image
ज्याच्या अंतःकरणात भगवंताच्या दर्शनाची ओढ आहे ना ती ओढ इतरांना जरी समजली नाही किंवा दाखवली जरी नाही तरी भक्ताची ती ओढ भगवान परमात्म्याला तरी नक्की कळते. त्या एका भगवंतापासून काही लपत नाही. आपल्या मनातील सर्वच्या सर्व भाव भगवंताला समजतात. भगवान परमात्मा हा मनकवडा आहे. त्याला सर्वांच्या मनातले जाणता येते. पण जर त्या भगवंताच्या दर्शनाची अपेक्षा ओढ तुमच्या मनामध्ये असेल तर तो भगवान परमात्मा त्याची नोंद घेतो. त्या भगवंताकडे सर्वांची नोंद घेतली जाते. आपल्या अंतःकरणातील ओढ पाहून भगवान परमात्मा आपल्याकडे येतो. अन आपल्याला दर्शन देतो. भगवंताला भेटण्याची ओढ पण मात्र तेवढीच त्या प्रमाणात असली पाहिजे. आपल्या अंतःकरणातील भाव जर तेवढा प्रबल नसेल तर मग मात्र परमात्मा तेवढ्या लवकर प्रगट होणार नाही. भाव पण तेवढाच प्रबल असला पाहिजे. तेव्हाच आपल्याला भगवान परमातम्याची प्राप्ती होईल. हा महत्वाचा विचार आहे. _ गुरुवर्य श्रीकृष्णकृपांकित🙏🏻🌸🌷 चिंतनाची लिंक https://www.youtube.com/live/tJcd32mQlTU?feature=shar रामकृष्णहरी🙏🏻🌸🌷

संतसंगतीचे काय सांगू सुख

Image
संतांची संगती ही अतिशय महत्वाची असते. संतांची संगती ही सहजपणे मिळत नाही. भगवान परमात्म्याच्या कृपेनेच संतांची संगती प्राप्त होत असते.  संतसंगतीचे काय सांगू सुख | आपणापारिखे नाही तेथे || संतांच्या संगतीत आपलेपणा अन परकेपणा नसतो. संतांजवळ सर्वजन आपलेच असतात. संतांसाठी परके कोणी नसतेच. त्यांच्यासाठी सर्वजन स मानच असतात. असे त्या ठिकाणी सर्वांवर समदृष्टीने प्रेम करणारे संत असतात.  ऐसी कळवळ्याची जाती | करी लाभावीण प्रीती || असे लाभवाचून प्रेम करणारे संत आहेत. ज्याप्रमाणे आई लेकरावर प्रेम करत असते त्याप्रमाणे संत हे त्यांच्या शिष्यावर प्रेम करत असतात. संतांची भेट होणे ही फार दुर्लभ गोष्ट आहे.  बहू अवघड आहे संतभेटी | परी जगजेठी करुणा केली || चंद्रामृत त्या ठिकाणी सहजपणे सेवन करता येईल. अस्तमाला जाणारा सूर्य देखील पकडता येऊ शकतो. अशा कठीण गोष्टी साधता येतील पण साधूची संगती ही सहजपणे साधता येणार नाही. राजाच्या संगतीत एक दिवस गुलामी करावी लागेल पण साधूंची संगती केली तर एक दिवस भगवान परमात्म्याची प्राप्ती घडून येईल. एवढे सामर्थ्य हे साधूच्या संगतीतील आहे. साधूसंत हे भगवान परमात्म्या...

देव वसे चित्तीं ।त्याची घडावी संगती ॥

अभंग: देव वसे चित्तीं । त्याची घडावी संगती ॥१॥  ऐसें आवडतें मना ।  देवा पुरवावी वासना ॥ध्रु.॥  हरीजनासी भेटी ।  नहो अंगसंगें तुटी ॥३॥  तुका म्हणे जिणें ।  भलें संतसंघष्टणें ॥४॥ अभंगाचा भावार्थ:- जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या माध्यमातून भगवंताशी संवाद साधतात. भगवंताविषयीच बोलतात. भगवंताला म्हणतात, हे देवा माझ्या अंतःकरणात काही भाव आहेत. ते मी तुझ्या समोर व्यक्त करतो. ज्याच्या चित्तामध्ये भगवान परमात्मा कायमस्वरूपी वास्तव्य करतो ना, मला त्यांची संगती घडावी. देव वसे चित्ती | त्याची घडावी संगती || कारण, त्यांच्या संगतीत रहायला माझ्या मनाला आवडते. तेच माझ्या मनाला प्रिय वाटते. म्हणून हे भगवंता माझ्या मनातील तीच एक इच्छा पूर्ण करावी. अन अखंड मला संतांच्या संगतीमध्ये ठेवा. मला दुसरे काहीच नकोय. फक्त अखंड संतांची संगती असावी. एवढीच एक माझी इच्छा पूर्ण करावी.  ऐसे आवडते मना | देवा पुरवावी वासना ||  हरि जनांच्या संगतीत म्हणजेच हरि भक्तांच्या संगतीत राहणे हे फार विलक्षण आहे. म्हणून हरि भक्तांची संगती ही अखंड घडत रहावी. कधीच त्यांचा अन माझा वियोग...

सत्यवादी व्यवहार हीच भगवान परमातम्याची पूजा

Image
र्व ठिकाणी भगवान परमात्माच गच्च भरलेला आहे असे समजून भगवान परमात्म्यासोबत व्यवहार करावा. सत्यवादाने व्यवहार करावा. आपल्या व्यवहारापासून समोरच्याला कोणत्या व्यवहाराचे दुःख होऊ देऊ नये. प्रत्येकाचे मन राखावे.  प.पू. ब्रह्मलीन स्वामीजी नेहमी सांगत असे, राखावी बहुतांची अंतरे | भाग्य येती तदनंतरे || प्रत्येकाचे अंतःकरण जपावे लागते. कोणालाच दुःख प्राप्त होऊ नये. याची जबाबदारी घेतली पाहिजे. खरा परमार्थ हाच आहे. शस्त्राने जरी इजा होत असेल ना, त्याहीपेक्षा जास्त शब्दाने इजा होत असते. शस्त्राने झालेली जखम औषधाने बरी होते पण शब्दाने झालेली जखम ही कशानेही ठीक होत नसते. म्हणून शब्दसुद्धा शस्त्र आहेत. ते जपून वापरले पाहिजे. आपल्या शब्दाने जर कोणी दुखावले जात असेल तर माझा देव दुखावला गेला असे वाटले पाहिजे. सर्व ठिकाणी तो परमात्माच गच्च भरलेला आहे असे पहावे. असे पाहून त्या भगवान परमात्म्यावर प्रेम करावे. अन प्रेम करून त्याला सुखी करावे. त्या भगवान परमात्म्याला सुखी कराल तर तो भगवान परमात्मा दर्शन देईल. आशीर्वाद देऊन कृपा करील. म्हणून आपण प्रत्येकाशी देव समजून व्यवहार करावा. सत्यवादाने प्रत्येकाशी ...

ज्ञानी पुरूषाचे लक्षण

Image
 ज्ञानी महापुरुषाचे लक्षण:- अभिमान न बाळगता सर्वांच्या समोर नतमस्तक होणे हेच खऱ्या ज्ञानाचे लक्षण आहे. अहंकार वाईट आहे. ज्यांच्या जीवनात अभिमान नाही तेच खरे संत आहेत. ज्याच्या जीवनात ज्ञानरुपी फळ प्राप्त झाले तोच झुकतो सर्वांसमोर नतमस्तक होतो.  श्री संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करून सांगतात, का फळलिया तरूची शाखा। सहजे भूमीसी उतरे देखा। तैसे जीवमात्रा अशेखां। खालावती ते।। जास्त फळ असलेल्या झाडाचीच शाखा ही जमिनीच्या दिशेने वाकलेली दिसते. त्याचप्रमाणे फक्त ज्ञान ज्ञान म्हटल्याने ज्ञान होत नाही. जे खरे ज्ञान असते ते सर्वांच्या समोर नतमस्तक होण्यासाठी कारणीभूत असते. खरे ज्ञान कोणाला हे कसे समजावे तर, जे जे भेटे भूत। ते ते मानिजे भगवंत। हा भक्तियोगु निश्चित। जाण माझा।।जो खरा ज्ञानी असतो त्याला प्रत्येक प्राणिमात्रामध्ये भगवंत दिसतो. जो खऱ्या अर्थाने सर्वांच्या समोर नतमस्तक होत असतो त्यालाच खरे ज्ञान झाले असे समजावे हेच खऱ्या ज्ञानाचे लक्षण आहे.नम्र झाला भूता। तेणे कोंडीले अनंता।। म्हणून अशा पद्धतीने सर्वांसमोर नम्रतेने नतमस्तक होणे हेच खरे ज्ञानाचे लक्षण आहे. _गुरुव...